GizMarathi, Tech in Marathi, मराठी भाषेतून तंत्रज्ञान
नमस्कार मित्रांनो, गिझमराठी या ब्लॉगमध्ये तुम्हाला तंत्रज्ञानविषयक अद्ययावत माहिती मराठी भाषेतून वाचायला भेटेल. तसेच स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्स विषयक नवनवीन माहितीही वाचायला मिळेल.
| एक वर्ष जुना असलेला IQOO 3 का आहे Poco X3 Pro च्या टक्करचा?
शाओमीअंतर्गत येणाऱ्या पोको या ब्रँडने त्यांचा पोको एक्स ३ प्रो हा स्मार्टफोन ३० मार्च २०२१ रोजी लाँच केलाय (Poco X3 Pro launch date - 30 March 2021). कंपनीकडून अधिकृतरीत्या असं सांगण्यात येतंय कि हा आयकॉनिक Poco F1 या लोकप्रिय फोनचा उत्तराधिकारी आहे आणि याचसोबत पोको कंपनीने Poco F2 ज्याची अनेक टेकप्रेमी आणि चाहते आतुरतेने वाट पाहत होते त्या फोनच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
Poco X3 Pro
अर्थातच Poco F1 हा त्याच्या काळातल्या सगळ्यात आधुनिक अन वेगवान अशा Qualcomm Snapdragon 845 या ८ मालिकेतील प्रोसेसरसहित आला होता आणि आजच्या घडीला असा प्रोसेसर आहे Snapdragon 888, जे २०,०००रू पेक्षा कमी किमतीत आणणे जवळपास अशक्य आहे. आणी म्हणूनच पोको कंपनीने जवळपास दोन वर्ष जुन्या असलेल्या Snapdragon 855+ ची हुबेहूब नक्कल असलेल्या Snapdragon 860 या नावाच्या प्रोसेसरसहित Poco X3 Pro स्मार्टफोन सादर केला ज्याद्वारे कंपनीला पुन्हा Poco F1/पोको एफ १ च्या लोकप्रियतेला गवसणी घालता यावी!
वीस हजारांच्या आतमधील हा सौदा नक्कीच फायदेशीर आहे पण याही पेक्षा भारी पर्याय असू शकतो का?
नक्कीच!
काय आहे Poco X3 Pro/पोको एक्स ३ प्रो मध्ये एवढं खास?
क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉनच्या ८ मालिकेतील दमदार प्रोसेसर सोडून खास म्हणता येतील असे पुढील फीचर्स आपल्याला Poco X3 Pro मध्ये पाहायला मिळतात!
५१६० mah ची भरभक्कम बॅटरी ३३ वॉटच्या फास्ट चार्जिंगसहित ज्यात USB PD चा देखील सपोर्ट आहे.
कॉर्निग गोरिला ग्लास ६ ची सुरक्षा
IQOO/आयकू ? हा कोणता ब्रँड ?
जसा पोको हा शाओमीचा एक सबब्रँड आहे तसाच आयकू हा विवो या कंपनीचा सबब्रँड आहे! म्हणजे जसं आपण शाओमीच्या भरोसे पोकोचा स्मार्टफोन घेतो तसच विवोच्या भरोसे आयकू या कंपनीचे फोन घेऊ शकतो!
थोडक्यात सांगायचं तर जे काही स्मार्टफोनचं तंत्रज्ञान किंवा छोट्या पार्ट्सचा सप्लाय असतो तो दोन्ही कंपन्यांचा समायिकच असतो!
म्हणजे तुम्ही विवोच्या फोनसारखी गुणवत्ता या आयकूच्या स्मार्टफोनमध्ये अपेक्षित ठेवून चालू शकता! शिवाय सर्व्हिस सेंटर्सही सामयिकच आहेत!
आयकू ३ बद्दल...
IQOO 3 हा स्मार्टफोन २५ फेब्रुवारी २०२० ला लाँच झालाय म्हणजे जवळपास एकवर्षांपूर्वी! पण या स्मार्टफोनच्या लाँच झालेल्या तारखेवर जाऊ नका! फोन कधीही लाँच होवो पण त्यात मिळणारं तंत्रज्ञान हे नेहमी अत्याधुनिक असावं ! हा स्मार्टफोन एका फ्लॅगशिप किमतीत आला होता आणि एक गेमिंग फोन म्हणून कंपनीने लाँच केला होता! त्यावेळच्या याच्या किमतीनुसार हा फोन तेवढा इंटरेस्टिंग नक्कीच नव्हता!
IQOO 3
आयकू ३ मध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 865/क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन ८६५ हे प्रोसेसर पाहायला मिळतं जे पोको एक्स ३ प्रो मध्ये मिळणाऱ्या स्नॅपड्रॅगॉन ८६० पेक्षा वरचढ आहे. तुम्हाला कदाचित वाटेल कि जास्त फरक नसेल पण ८६५ हे प्रोसेसर ८६० पेक्षा ३० टक्के अधिक कार्यक्षम आणि वेगवान आहे जो खूप मोठा फरक मानला जातो.
पण पोको एक्स ३ प्रो सोबत आयकू ३ची तुलना का करायची ?
पोको एक्स ३ प्रो प्रमाणेच आयकू ३ हाही एक गेमिंग फोन म्हणूनच लाँच झाला होता आणी दोन्हीमध्ये आपल्याला ८ मालिकेतील प्रोसेसर पाहायला मिळतंय.
आयकू ३ हा स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्ट या ऑनलाईन साईटवर फक्त २४९९० रुपयांमध्ये मिळत आहे जी नक्कीच एक किफायतशीर ऑफर आहे! या फोनचं हे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएन्ट आहे!
IQOO 3 on Flipkart
आता या फोनवर आपल्याला बाकी ऑफर्सहि मिळतात जसं 5% Cashback on Flipkart Axis Bank Credit Card/ फ्लिपकार्ट ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर ५ टक्के सूट आणि exchange offer/एक्सचेंज ऑफर.
या ऑफर जर आपण घेतल्या तर हा फोन आपल्याला वीस हजारापेक्षा कमी किमतीत पाहायला मिळतो!
पोको एक्स ३ प्रो चं ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेलं व्हेरिएन्ट २१००० रुपयांमध्ये मिळतंय. आता इथेही १००० रू ची सूट आहेच. पण इथे आपल्याला किमतीत थोडा फरक आढळतो पण तुलनात्मक गुणवत्ता पाहायला मिळते.
आयकू ३ कसा वरचढ आहे? । How IQOO 3 is better than POCO X3 Pro?
आयकू ३ मध्ये आपल्याला एकवर्ष जून प्रोसेसर पाहायला मिळत पण तंत्रज्ञान मात्र एक वर्ष जुनं आहे. तिथेच पोको एक्स ३ प्रो मध्ये नावाला जरी नवीन प्रोसेसर असला तरी तंत्रज्ञान २ वर्षे जुनं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे दोन्ही प्रोसेसरमध्ये एवढा फरक नक्कीच आहे जो एका प्रोफेशनल गेम खेळणाऱ्या व्यक्तीला समजेल!
शिवाय आयकू ३ हा एक फ्लॅगशिप स्तरावरचा फोन म्हणून लाँच झाला होता आणि त्यातले काही फीचर्स जसे AMOLed Display/एमोलेड डिस्प्ले, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर/ In Display Finger Print Scanner, आयपी रेटिंग, ग्लास मेटल बिल्ड, haptic feedback नक्कीच भन्नाट आहेत जे या स्मार्टफोनला स्पर्धकापेक्षा वरचढ बनवतं.
विशेष म्हणजे यात गेमिंगसाठी वेगळे दिलेले बटन आहेत ज्याला आपण एअर ट्रिगर्स/Air triggers/Pressure triggers असं म्हणतो शिवाय ५५ वॅट ची फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे (55 Watt Charging).
खाली काही ठळक मुद्दे दिलेत ज्यातून वरील दोन्ही स्मार्टफोनमधील फरक लक्षात येईल!
Poco X3 Pro
IQOO 3
Processor (SOC)
860(855+)
865
Antutu benchmark score
4,60,000
5,80,000
Ram Type
LPDDR4x
LPDDR5
Storage Type
UFS3.1
UFS3.1
Battery capacity and fast charging
5160mah@33w
4440 mah@55w
Camera
48 + 8+ 2 +2
48 + 13 +13 + 2
Display protection/back
GG6/plastic
GG6/GG6
Pressure Triggers
no
yes
IndisplayFingerprint Scanner
no
yes
Cooling technology
Liquid Cool technology plus
Carbon Fiber Vapour Cooling System
Earphone
no
yes
Build
Plastic
Metal+glass build
Refresh rate
120 Hz
60 Hz
Haptics
not so good
good
आमचं मत!
एक स्मार्टफोन म्हणून सगळया बाबींचा विचार केला तर आयकू ३ ही एक नक्कीच चांगली डील आहे ज्यात आपल्याला एमोलेड डिस्प्लेसहित अधिक वेगवान प्रोसेसर, उत्तम फास्ट चार्जिंग, भारी बिल्ड क्वालिटी तसेच बाकीचे फ्लॅगशिप फीचर्स मिळतात. (यात कॅमेरा हि एक वैशिष्ट्य सांगता येईल).
तुम्हाला एका गेमिंग फोनची गरज असेल तर नक्कीच पोको एक्स ३ प्रो ऐवजी तुम्ही आयकू ३ या फोनकडे पाहू शकता!
आपण जेंव्हा एखादी वेबसाईट उघडतो त्यावेळेस त्यात दिसणारी माहिती जसं कि अक्षर, इमेज, ऑडिओ आणि विडिओ फाईल हि आपल्या कॉम्पुटरवर किंवा मोबाईलवर नसते ती इंटरनेटद्वारे एका दुसऱ्या कॉम्पुटरवरून येते! वेबसाईटची ही माहिती मिळवण्यासाठी आपल्या कॉम्पुटरवरचं Browser/ब्राऊजर(जस कि इंटरनेट एक्सप्लोरर किंवा क्रोम) त्या दुसऱ्या कॉम्प्युटरसोबत संपर्क प्रस्थापित करायचा प्रयत्न करते!
आपल्याला एखाद्या व्यक्तीला संपर्क करायचा असल्यास पहिल्यांदा आपण आपल्या मोबाईलच्या कॉन्टॅक्टबुकमध्ये त्या व्यक्तीचं नाव टाकून शोधतो आणि मग फोन नंबर मिळवून त्या फोन नंबरद्वारे संपर्क प्रस्थापित करतो. म्हणजे भलेही आपल्याला नाव माहिती आहे पण संपर्क साधायला मात्र नंबरच लागतो, नाव तर लक्षात राहायला सोपं म्हणून वापरला जातं. अगदी तसंच ब्राऊजरला हा संपर्क साधण्यासाठी Domain Name/डोमेन नेम आणि IP Address/आयपी ऍड्रेसची गरज असते.
लक्षात राहायला सोपे म्हणून डोमेन नेम वापरला जातं जे आपण स्वतः ब्राऊजरला टाईप करून सांगतो आणि आयपी ऍड्रेस म्हणजे फोन नंबर जो ब्राऊजर स्वतः हुन मिळवतो आणि त्या दुसऱ्या कॉम्प्युटरला संपर्क करतो ज्यावरून आपली वेबसाईट येते. या दुसऱ्या कॉम्प्युटरलाच आपण वेब सर्वर किंवा होस्ट सर्वर असं म्हणतो.
या होस्ट सेर्व्हरबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊच पण त्याआधी डोमेन नेम काय असतं हे जाणून घेऊ.